पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेचा पराभव झाला. भुगाव जि.पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अक्षय शिंदेने त्याचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
कौतुक डाफळेच्या पराभवाने पुन्हा कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरीचे स्वप्न अधुरेच राहीले. गेल्या दोन तपापासून कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली नाही. १९९९ ला खामगाव येथे निवनोद चौगुलेने महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला होता.