पुणे : कळमोडी धरण शंभर टक्के भरले

Last Updated: Aug 12 2020 11:20AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा 

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून आरळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

अधिक वाचा : मुलीच्या तेराव्यास जाण्यासाठी डीएसकेंना  परवानगी

कळमोडी धरण १.५१ टीएमसी क्षमतेचे असून मागील वर्षापेक्षा यावर्षी धरण भरण्यास एक महिना उशीर झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ५३४ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. धरण १०० टक्के भरून धरणाच्या सांडव्यावरून आरळा नदी पात्रात मध्यरात्री १२९ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

अधिक वाचा : कोरोना रुग्णांची बेडसाठी तडफड ;पुण्यात रेल्वेचे 450 बेड पडून