Wed, Aug 12, 2020 12:14होमपेज › Pune › काळजीचे ग्रहण; दररोज एक 'लव्ह बर्ड' जातेय पळून

काळजीचे ग्रहण; दररोज एक 'लव्ह बर्ड' जातेय पळून

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 9:36AMपुणे :  अक्षय फाटक

माता-पिता आणि मुलांची एकमेकांवरील माया, आपुलकी आणि प्रेमाची भावना याला दुसरी उपमा नाही, म्हटले जाते. परंतु,  आई-वडिलाच्या निरपेक्ष प्रेम आणि वासल्याला सध्याच्या तरुणाईने काळजीचे ग्रहन लावल्याचे चित्र आहे. कारण, आयुष्याची नवीनवी स्वप्ने रंगवत उमलत्या कळ्या पालकांच्या विश्‍वास काही क्षणात तोडून प्रेमात रंगून भुर्रर्र उडून जात आहेत. विशेष म्हणजे, अशा पळून जाऊन लग्न करण्याच्या घटनांत दिवसेंदिवस होणारी वाढ चिंताजनक आहे. पोलिसांकडील नोेंदीवरून तरुणाईचे शहर म्हटल्या जाणार्‍या पुण्यातून 14 ते 18 वर्षांच्या आतील दररोज एक ‘लव्ह बर्ड’ नवी स्वप्न रंगवत आकाश कवेत घेत आहेत. 

शिक्षणाचे घर असलेले पुण्यात खास शिक्षण आणि नोकरीनिमित्त तरुण मोठ्या संख्येने दाखल होत आहे. कामाच्या शोधात येणार्‍या कुटुंबांची संख्या कमी नाही.  महानगरात आल्यानंतर शिक्षण, नोकरीमुळे अख्खं कुटुंब सुधारते. त्यामुळे मुला-मुलींचे जीवनमान बदलून जाते. शहरात मुक्त वातावरण...त्यात मुलांचं वयही स्वछंदी असतं. त्यामुळे तितकीशी समज नसलेल्या वयात कोवळी मुलं ‘प्रेमरंगी’ होतात. शिक्षण घेण्याचं, पालकांची स्वप्न पूर्ण करण्याची दिशा मिळण्याच्या वयातच प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि त्यातून चुकीचं पाऊल उचलतात. पालकांचा विरोेध असतानाही जोडीदाराच्या वचनात अडकल्याने मुले-मुली पळून जातात. मात्र, पुरेशी समज नसलेल्या वयात आपल्या पाल्याने निवडलेल्या मार्गामुळे पालक पुरते कोलमडून जातात. 

वाचा : युवतीवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपातही : एकावर गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, 14 वर्षांपुढील मुली या प्रेमात पळून जात असल्याचे निरीक्षण एका पोलिस अधिकार्‍याने नोंदवले.   पोलिसातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षात शहरातून 14 वर्षांपुढील तब्बल 424 मुली आणि 189 मुलांना फूस लावून पळून नेल्याचे प्रकार घडलेले आहेत. हे धक्कादायक म्हणावे लागेल. कारण न कळत्या वयात मुले भरकटत असल्याने  आई-वडिल पार कोलमडून जातात. त्याशिवाय  पोलिस यंत्रणेलाही मुलांच्या शोध घेण्यासाठी ’जंग जंग पछाडावे’ लागते. कारण 18 वर्षाखालील मुलगी हरवली किंवा स्वत:हून घर सोडले. तसेच प्रियकरासोबत पळून गेलेली असली तरीही ती अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.

अशा प्रकारे गेल्या वर्षभरात तब्बल 544 मुली आणि 273 मुले पळून गेलेली आहेत.  त्यामुळे याप्रकरणी फूस लावून पळवून नेल्याचे (अपहरण) गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या संमतीने आणि घरातून न सांगताच निघून पळून जाण्याच्या मुला-मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही प्रकरणात  मौज-मजेसाठीही मुले घर सोडत असल्याचे काही घटनांवरून पाहायला मिळते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली मुले-मुली स्वत:हून पळून जातात. मात्र  त्याचा त्रास त्यांच्या आई-वडिलांसह पोलिस यंत्रणेला होत आहे. पानवलेल्या डोळ्यांनी जन्मदाते पोटच्या गोळ्याचा काही तपास लागला का याची माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्याचे उंबरे झिझवतात. पालकांची अशी अवस्था पाहून पोलिस यंत्रणाही ‘जोडप्यां’च्या शोधात धावाधाव करत आहेत. 

काहींचे आयुष्य उद्ध्वस्त होते

प्रेमा अडकल्याने स्वत:हून घर सोडणारी  मुले-मुली कायद्याने अल्पवयीन असतात. त्यामुळे याप्रकरणी थेट अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. काही कालावधीनंतर मुलीचा शोध लागतो. मात्र, गुन्हा दाखल असल्याने 18 वर्ष पूर्ण असणार्‍या मुलांना अटक केली जाते. त्यामुळे एकीकडे या मुलांचे आयुष्य बदलून जाते. न्यायालय आणि पोलिस ठाण्याची पायरी चढण्याचे त्यांच्या नशिबी येते. तर दुसरीकडे मुलींचेही आयुष्य उद्ध्वस्त होते.  आई-वडिलांना तिच्या पुढील आयुष्याची चिंता लागलेली असते. त्यानंतर लग्न करताना  पालक व या मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान अनेक घटनांमध्ये आप-आपसात मिटवून घेतले जाते. तर, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मान्य क रून संसारासाठी साथही दिली जाते. 

वाचा : पुणे : बाप-लेकाकडून तरुणीचा विनयभंग