Sun, May 31, 2020 14:02होमपेज › Pune › टीव्हीचा रिमोट दिला नाही; पतीकडून पत्नीचा चावा 

टीव्हीचा रिमोट दिला नाही; पतीकडून पत्नीचा चावा 

Last Updated: Nov 09 2019 2:04AM

संग्रहित छायाचित्रपुणेः प्रतिनिधी

सध्या काही मालिका एवढ्या लोकप्रिय आहेत की, त्या पाहण्यासाठी अगोदरपासूनच घरातील काही सदस्य टिव्हीचा रिमोट आपल्या ताब्यात घेऊन बसतात. परंतू मालिका पाहण्यात पुरूष देखील मागे नसल्याचा प्रत्येय कात्रज परिसरातील शिवशंभो नगरमध्ये समोर आला आहे.

त्याचं झालं असं मालिका पाहण्यासाठी पत्नी रिमोट देत नसल्यामुळे खवळलेल्या पतीने थेट पत्नीचा चावा घेत तिला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. मग काय यानंतर पत्नीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्याच पती विरोधात तक्रार केली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.०५) रात्री साडे अकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आरोपीची पत्नी आहे. मंगळवारी साडे अकराच्या सुमारास घरामध्ये फिर्यादी टिव्हीवरील मालिका पाहत बसल्या होत्या. दरम्यान पतीने पत्नीकडे दुसरा कार्यक्रम पाहण्याचा आग्रह केला. मात्र पत्नीने त्याला नकार दिला. यावरून दोघा पती पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. त्यावेळी पतीने शिवीगाळ करत पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर गळा दाबून उजव्या हाताच्या दंडाला चावा घेऊन पत्नीला जखमी केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चिवडशेट्टी करत आहेत.