Fri, Nov 27, 2020 22:34होमपेज › Pune › ‘गती’ महाचक्रीवादळ आज अरबी समुद्रात धडकणार

‘गती’ महाचक्रीवादळ आज अरबी समुद्रात धडकणार

Last Updated: Nov 23 2020 1:44AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

अरबी समुद्रात ‘गती’ नावाचे  महाचक्रीवादळ येत्या बारा तासांत धडकणार आहे. हे महाचक्रीवादळ  सोमवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता अरबी समुद्रात येईल. मात्र, तेथून ते काही तासांतच श्रीलंकेत जाणार आहे. तेथून ते 25 रोजी भारतात पुद्दुचेरी येथे येणार आहे. 26 पर्यंत ते तामिळनाडू, आंध— प्रदेशात सक्रिय राहून शांत होईल. भारतात या वादळाचा फारसा फटका बसणार नसला, तरीही हवामानशास्त्र विभागाने दक्षिण भारतातील सर्वच किनारपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

चालू वर्षात ‘अंफान’, ‘निसर्ग’ चक्रीवादळाने तडाखा दिला होता. नंतर ‘गती’ नावाचे महाचक्रीवादळ वर्षाच्या अखेरीस धडकत आहे. ‘गती’ महाचक्रीवादळ सोमवारी दुपारी 2 वाजता श्रीलंका किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा वेग ताशी 120 किलोमीटर इतका राहील. 25 नोव्हेंबरला हे वादळ भारतात पुद्दुचेरी भागात येईल; पण तोवर याचा वेग ताशी 80 ते 90 कि.मी. झालेला असेल, तरीही भारतीय हवामानशास्त्र विभागाने तामिळनाडू, केरळ, आंध— प्रदेश किनारपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा व चक्रीय स्थिती निर्माण होत असून 23 ते 27 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण भारतात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज विशेष बुलेटिनद्वारे रविवारी दुपारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

मराठवाडा, विदर्भात 25, 26 रोजी पाऊस

गती महाचक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात अतितीव— कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतात 23 ते 27 नोव्हेंबर या काळात अतिमुसळधार पाऊस होईल. मात्र महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत 25 व 26 रोजी मुसळधार  पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.