चार दिवस कोकणात काही भागात मुसळधार

Last Updated: Jul 15 2020 1:31AM
Responsive image


पुणे :  पुढारी वृत्तसेवा 

आगामी चार दिवस कोकण विभागातील पालघर,ठाणे,मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसाळधार पाऊस तर उर्वरित राज्यात काही भागात मध्यम तर बहुतांश भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ या पट्ट्यात कमी दाबाचा पट्टा कायम आहे.त्यामुळे पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 15 ते 18 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल.तसेच नाशिक 15 जुलै,पुणे घाटमाथा 15 ते 17 जुलै,कोल्हापूर,सातारा 15 व 16 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या चोवीस तासात जोर कमी

राज्यात गेल्या चोवीस तासात पावसाचा जोर कमी झाला असून मालवण 110,सावंतवाडी 90, मुंबई,पालघर 70,दौंड 40,किनवट 60,वर्धा 40 मिलिमीटर तसेच .घाटमाथा भागातही सरासरी 25 मी मी पावसाची नोंद झाली.