Tue, Aug 11, 2020 22:06होमपेज › Pune › संपामुळे फळभाज्या महागल्या

संपामुळे फळभाज्या महागल्या

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:00AMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या संपाच्या तिसर्‍या दिवशी शहरातील मार्केटयार्डातील तरकारी विभागात सर्व प्रकारच्या शेतमालाची आवक घटली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी अवघी 75 टक्के आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने टोमॅटो, सिमला मिरची आणि घेवड्याच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. तर, कांदा, आले, गवार, भेंडी, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, वांगी आणि शेवगाच्या भावात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. 

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात रविवारी फळभाज्यांची सुमारे 100 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. मध्य प्रदेश, इंदौर येथून 2 टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटक येथून 4 ते 5 ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून 5 ट्रक मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरीची 7 ते 8 टेम्पो आवक झाली. कांद्याची 50 ते 60 ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 50 ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून मिळून लसणाची सुमारे 4 ते साडेचार हजार गोणीची आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा :100-140, बटाटा : 130-170, लसूण :100-300, आले सातारी : 550-580, भेंडी : 300-400, गवार : 250-500, टोमॅटो : 200-250, दोडका : 350-500, हिरवी मिरची : 400-500, दुधी भोपळा : 60-150, चवळी : 200-300, काकडी : 150-200, कारली : हिरवी 350-400, पांढरी : 200-250, पापडी : 300-350, पडवळ : 200-220, फ्लॉवर : 150-200, कोबी : 50-80, वांगी : 150-350, डिंगरी : 180-200, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 400-450, तोंडली : कळी 250-300, जाड : 140-150, शेवगा : 450-550, गाजर : 100-160, वालवर : 300-350, बीट : 100-120, घेवडा : 1000, कोहळा : 100-150, आर्वी : 280-250, घोसावळे : 200-250.

कोथिंबीर, शेपू स्वस्त; मेथी, कांदापात महागले

शेतकरी संप काळातही मार्केट यार्डातील तरकारी विभागात आवक चांगली झाल्यामुळे कोथिंबीर आणि शेपूच्या शेकडा जुडीमागे अनुक्रमे चारशे ते दोनशे रुपयांनी घट झाली आहे. तर आवक घटल्याने मेथी आणि कांदापातीच्या भावात मात्र वाढ झाली आहे. मेथी, कांदापातीच्या भावात अनुक्रमे 600 आणि 500 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी येथील बाजारात कोथिंबिरीची 90 हजार तर मेथीची 15 हजार जुडींची आवक झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.  पालेभाज्यांचे शेकडा जुडीचे भाव : कोथिंबीर : 800-1400, मेथी : 1500-2200, शेपू : 500-1000, कांदापात : 500-1500, चाकवत : 800-1000, करडई : 500-800, पुदिना : 200-300, अंबाडी : 500-800, मुळे : 1000-1500, राजगिरा : 500-700, चुका : 700-800, चवळई : 500-800, पालक : 500-700