Tue, Aug 04, 2020 13:38होमपेज › Pune › नियम पाळा; अन्यथा पुन्हा लॉकडाऊन

नियम पाळा; अन्यथा पुन्हा लॉकडाऊन

Last Updated: Jul 07 2020 1:34AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन शि थिल केला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेचप्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशी परिस्थ तिी कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी क्रीडा आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन- प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्‍त पवनीत कौर, कृषी आयुक्‍त सुहास दिवसे व कृषी शिक्षणस ंशोधन परिषदेचे सदस्य सचिन मानेया भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकार्‍यांची नियुक्‍ती केल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

... तर सारे गाव प्रतिबंधित

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे लागणार आहे. ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर भर दिला जाणर असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामीण भागात नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे; तसेच लग्नसमारंभात दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी होताना दिसून येत आहे. त्यादृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आली असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्‍तही होम क्‍वारंटाईन

महापौरांच्या संपर्कात आलेले महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाडही आता सेल्फ होम क्‍वारंटाईन झाले आहेत. त्यातच महापौरांच्या निवासस्थानामधील आणखी एका कर्मचार्‍याला कोरोना झाला आहे. महापौरांना कोरोना झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे हेस्वत: होम क्‍वारंटाईन झाले. आज आयुक्‍त गायकवाड यांनी पुढील दोन दिवसांसाठी क्‍वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता महापालिकेची प्रमुख यंत्रणाच कोरोनाच्या चक्रात अडकली आहे.

चार अधिकार्‍यांची नियुक्‍ती

नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना रोखण्यासाठी विशेष अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुण्यात चार अधिकार्‍यांची नियुक्‍ती करून त्यांच्याकडे विशेष कामगिरी सोपविली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिन माने यांच्याकडे पुणे , पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी करणा-या शासकीय, खासगी लॅबवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. लॅबमध्ये कोरोना ( कोविड-19) टेस्टची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे,लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे, टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणे आदी जबाबदारी दिली आहे. क्रीडा आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्‍तींना शोधणे, आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्‍त पवनीत कौर यांच्याकडे कोरोना रुग्णांना वेळेवर बेड मिळणे, रुग्णालयांतील बेडची माहिती व डॅशबोर्डचे संनियंत्रण ही जबाबदारी आहे. कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांच्याकडे कोरोना रोखण्यासाठी लोकसहभाग मिळवणे, सामाजिक संस्थांची मदत घेण्याची जबाबदारी दिली आहे.