Thu, Jul 09, 2020 23:33होमपेज › Pune › पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण (video)

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण (video)

Last Updated: May 01 2020 9:43AM

उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिग पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

अधिक वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.