Mon, Sep 28, 2020 13:29होमपेज › Pune › डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:03PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरीतील  डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ‘डा विन्सी एक्स आई’ कंपनीच्या अत्याधुनिक रोबोटच्या साहाय्याने 25 जून रोजी मूतखडा झालेल्या रुग्णांवर पहिली यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या प्रयत्नातून रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले रोबोट स्थापित करण्यात आले. 

आंबेगाव येथील 40 वर्षीय महिलेला दोन आठवड्यांपूर्वी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर तिला एका मूत्रपिंडामध्ये 6 सेमी  आकाराचा काटेरी व शिंगासारखा मूत्रखडा तसेच दुसर्‍या मूत्रपिंडात लहान मूत्रखडे होते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते. तिच्या दुसर्‍या मूत्रपिंडामधील मूत्रखडे लॅप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे काढण्यात आले. मात्र, पहिल्या मूत्रपिंडातील खड्याचा आकार मोठा असल्याने ते काढण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा वापर करण्यात आला. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीरामध्ये 5 मिमीची पाच छिद्रे करून शस्त्रक्रिया करण्यात आली व मूत्रपिंडातील खडा बाहेर काढण्यात आला. हीच शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने केली असता जास्त चिरफाड करावी लागली असती. याने संसर्ग होण्याची भीती होती. हे सर्व टाळण्यासाठी रोबोटिक सर्जरीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सर्व तपासण्या व ऑपरेशन योग्य झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेसाठी युरोलॉजी विभागाचे डॉ. एस. पी. कांकलिया डॉ. व्ही. पी. साबळे, डॉ. वी. पी. सावंत, डॉ. सुनील म्हस्के, डॉ. हिमेश गांधी, डॉ. दीपक माने, डॉ. अभिरुद्रा मुळे, डॉ. मेहुल सिंह तसेच निवासी डॉक्टर्स आणि भूल तज्ज्ञ विभागाचे डॉ. पी. एस. गरचा, डॉ. शीतल व डॉ. भूषण यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, शैक्षणिक संचालिका डॉ. वत्सला स्वामी,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण उपस्थित होते.