Tue, May 26, 2020 16:00होमपेज › Pune › 'मराठी भाषा संवर्धनासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गरज' (video)

'मराठी भाषा संवर्धनासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गरज' (video)

Last Updated: Feb 27 2020 9:12AM
पुणे : पुढारी ऑनलाईन

मराठी भाषेचा विकास हा श्रवणातून वाचनाकडे झालेला आहे, मात्र आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पालकांमध्ये असलेले आकर्षण, घरी इंग्रजी बोलण्याचा धरलेला आग्रह. यामुळे मराठी घरातूनच मराठी भाषा हद्दपार होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्नांची गरज आहे. 

अधिक वाचा : टॉपटेन भारतीय भाषांमध्ये मराठी तिसरी

मराठी भाषा धोरण, बारावीसह उच्चशिक्षणामध्ये मराठीची सक्ती यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद जोशी, अनिल गोरे आणि प्राध्यापक प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त दैनिक पुढारी कार्यालयामध्ये मराठी भाषेची आजची स्थिती, भविष्य आणि मराठी भाषेचा प्रलंबित असलेला अभिजात दर्जा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी मत व्यक्त केले.