Fri, May 07, 2021 19:01होमपेज › Pune › आईच्या आजारपणामुळे अजितदादांनी कार्यक्रम सोडला अर्धवट

आईच्या आजारपणामुळे अजितदादांनी कार्यक्रम सोडला अर्धवट

Published On: Aug 11 2018 11:06PM | Last Updated: Aug 11 2018 11:06PMपुणे : प्रतिनिधी

आई आजारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रम अर्धवट सोडला. त्यांच्या आईंना तापसण्याकरिता मुंबईवरून डॉक्टर येणार होते. तशी वेळ अजितदादांनी त्या डॉक्टरांना दिली होती. मात्र, एनवेळी आयोजकातर्फे कार्यक्रम लांबल्यामुळे त्यांनी कार्यक्रमातून काढता पाया घेतला. दरम्यान, डॉक्टर तपासणीकरिता माझ्या घरी हजर झाले असल्याने मी कार्यक्रमातून लवकर जातो आहे, अशी माहिती अजितदादांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ग्रामदेवता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे अध्यक्ष-पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार उल्हास पवार, संजय नहार, रेणू गावस्कर, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. अतुल कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष राजा टिकार उपस्थित होते. कार्यक्रमात मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, एकलव्य संस्थेच्या अध्यक्षा रेणू गावस्कर, जनकल्याण रक्तपेढी या समाज प्रबोधन, समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ग्रामदेवता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उल्हास पवार म्हणाले, आजच्या कालाट शिवाय. आजच्या काळात ओरसिद्धीचं वलय आलं आहे. प्रसिद्धी केल्या शिवाय आज आपण लोकशाहीत काय करतो, हे कळत नाही. रेणू गावस्कर म्हणाल्या, राष्ट्राचे प्रत्येक मूल महत्वाचे आहे. राष्ट्राच्या प्रत्येक मुलाची अवस्था आज केविलवाणी आहे. लहान मुले आपली गुरू असतात. प्रत्येक मूल आपल्याला काही तरी सांगते. ते मूल आपल्याला शिकवायला येते.