होमपेज › Pune › चंद्रकांत पाटील यांचे 'ते' विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी : अजित पवार 

चंद्रकांत पाटील यांचे 'ते' विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी : अजित पवार

Last Updated: Nov 22 2020 7:21PM

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे  : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले 'ते' विधान म्हणजे 'विनाश काले विपरीत बुद्धी' असेच म्हणावे लागेल, अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते़.

'शरद पवार छोटे नेते असतील, तर चंद्रकांत पाटील गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का?'

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात, राजकारणात येण्यापूर्वी मला पवार हे मोठे नेते वाटायचे, मात्र आता कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज अजित पवार यांनी  'विनाश काले विपरीत बुद्धी' असे म्हणत प्रत्युत्तर दिले. तसेच ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी? असे म्हटले आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या पाहूनच पुढचा निर्णय 

तसेच ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात ६० वर्ष काम केले. महाराष्ट्राची जाण असणारे नेते म्हणजे शरद पवार. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला किती वजन आहे. हे सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याने  पवार साहेबांवर असे विधान करणे शोभत नाही. एके काळी साहेबांबदल काय विधान केले आहे. हे सर्वांना आठवत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असेच म्हणाव लागेल अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. तसेच अशा प्रकारची वक्तव्य करणार्‍यांनी आपली उंची बघून तरी बोलावे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला.