Tue, Aug 04, 2020 22:29होमपेज › Pune › आता रस्त्यात बंद पडक्या ‘पीएमपीएल’वर गुन्हे

आता रस्त्यात बंद पडक्या ‘पीएमपीएल’वर गुन्हे

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:01AMपुणे :अक्षय फाटक 

शहराच्या प्रवाशांची लाईफ-लाईन असणारी पीएमपी रस्त्यातच बंद पडल्यानंतर वारंवार सांगूनही ती न काढल्याने अखेर पीएमपीएलवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशाप्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, पोलिसांकडून आता अशा प्रकारे पीएमपीएल रस्त्याच बंद पडल्यानंतर ती वेळत न काढल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.    

कायम रहदारी असणार्‍या विद्यापीठ चौकात गुरुवारी सकाळी 9 वाजता बस बंद पडल्यानंतर, ती दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 11 पयर्र्ंत काढण्यात आली नव्हती. त्यामुळे अखेर पोलिसांनी चालक, वाहक अन् जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी वाहतूक विभागाचे कर्मचारी सुहास तांबेकर यांनी फिर्याद दिली आहे. 

पीएमपीएलच्या स्वारगेट डेपोच्या बसवरील (क्र. एमएच.14.सीडब्ल्यु. 1940 आर/058) चालक आणि वाहक हे त्यांच्या ताब्यातील बस घेऊन गुरुवारी सकाळी विद्यापीठ चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने निघाले होते. मात्र, अचानक बस विद्यापीठ चौकात बंद पडली. त्यानंतर चालक ही बस तेथूनच सोडून निघून गेले. या बसमुळे तेथे मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यावेळी चतु:श्रृंगी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. नियत्रंण कक्षाने पीएमपीएल कंट्रोलला याची माहिती दिली. परंतु, बस काढण्यास कोणीच आले नाही. त्यामुळे पुन्हा पोलिसांनी बसच्या संबंधित अधिकार्‍यांना फोन केला. वारंवार सांगूनही दुसर्‍या दिवशी (दि. 9 शुक्रवारी) सकाळी 11पयर्र्ंत ही बस तशीच होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, येथून पुढेही अशी कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.