Thu, Aug 13, 2020 17:55



होमपेज › Pune › सर्वंकष कृती आराखडा तयार करा : अजोय मेहता

सर्वंकष कृती आराखडा तयार करा : अजोय मेहता

Last Updated: Jul 03 2020 6:22PM




पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी करा, अशा स्वरुपाचा सर्वंकष कृती आराखडा तयार करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी केल्या. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करताना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. अशा सुचना दिल्या. 

अधिक वाचा : बारामती : फायनान्स कंपन्यांना कडक इशारा!

यावेळी अजोय मेहता म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करताना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, कोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पहाणी व चाचण्यांचे प्रमाण वाढवा, त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरुन सामूहिक संसर्ग पसरणार नाही. 

अधिक वाचा : 'राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द'

एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करा, कोरोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु करा, आरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. कोरोना विषाणूविषयक नमुना चाचण्या वेळेत होत आहे किंवा कसे ? याकरीता एका अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचनाही  मेहता यांनी केली.

बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, आरोग्य सर्व्हेक्षण, मास्क, पीपीई कीट, आयसीयू, ऑक्सीजनयुक्त खाटा आणि श्वसनयंत्रे (व्हेटिंलेटर) इत्यादी विषयी माहिती दिली.

अधिक वाचा : बारामती : बेकायदा सावकारी; तिघांविरोधात गुन्हा   

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, नमुना चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा या बाबतची माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांचे निदान करण्यासाठी अँटीजेन टेस्ट कीटचा वापर करण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : पुणे शहरात उच्चांकी ९३७ रुग्ण

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली. जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येते, असे सांगितले.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या-त्यांच्या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.