Thu, Jun 24, 2021 11:52होमपेज › Pune › पुणे : खेडमध्ये कोरोना सदृश व्यक्तीचा अकस्मात मृत्यू

पुणे : खेडमध्ये कोरोना सदृश व्यक्तीचा अकस्मात मृत्यू

Last Updated: May 27 2020 2:48PM
राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा

वाडा आणि कमान ता. खेड जि. पुणे येथे बुधवारी (दि.२७) २ रुग्णांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे असल्याची चर्चा असल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. 

आणखी वाचा : 'त्या' वक्तव्याने वाढली तणातणी अन् राहुल गांधींची उद्धव ठाकरेंना फोनाफोनी!

कमान येथील ६२ वर्षीय मृत व्यक्ती अस्थम्याने आणि न्यूमोनियाने अत्यवस्थ झाली होती. या व्यक्तीचा औंध रूग्णालयात बुधवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर हा व्यक्ती कोरोना बाधित होता की नाही हे स्पष्ट होणार असल्याचे खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले. 

आणखी वाचा : ठाणे : 'त्या' खासगी रूग्णालयातील डॉक्टर्स-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

वाडा येथे मुंबईहून २२ मे रोजी गावी आलेल्या एका टायफॉईडने आजारी असलेल्या तरूणाचा चांडोली ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी घेता आला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू कशाने झाला याबाबतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या स्थितीत ही घटना घडल्याने मात्र वाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

आणखी वाचा : 'आधुनिक भारताचे शिल्पकार हे पंडित जवाहरलाल नेहरुच'

चाकण एमआयडीसी मध्ये एका कंपनीतील कामगार पिंपरी-चिंचवड येथून येजा करीत होता. तो मंगळवारी (दि.२६) पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कंपनीत त्याच्या संपर्कात आलेल्या २१ जणांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. असेही डॉ. गाढवे यांनी सांगितले. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या खेड तालुक्यातील जवळपास चाळीस व्यक्तींचे अहवाल येणे बाकी असुन, त्यामुळे बाधित व्यक्तींची संख्या वाढणार आहे.