Wed, Sep 23, 2020 01:11होमपेज › Pune › पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांवर

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांवर

Last Updated: Jul 14 2020 11:01AM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात (पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण) कोरोनाबाधित रुग्णसंख्या आज (ता.१४) सकाळी ४० हजार झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ९८ जणांनी जीव गमावला आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ हजार ४५७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या विविध रुग्णालयात १३ हजार २४९ रुग्ण उपचार घेत आहेत. 

अधिक वाचा : कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जुलैपासून नवीन रुग्णसंख्या १ हजाराच्या पटीत वाढत आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात १३३३ नवीन रुग्ण वाढल्याने हा एकूण आकडा ३९८३५ झाला होता. त्यामध्ये एका रात्रीत आणखी २५२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता रुग्णसंख्या ४० हजार ८७ वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या १ हजार ९८ झाली आहे.

अधिक वाचा : चक्क विमानात 'त्या' व्यक्तीने उघडली छत्री  

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून १ लाख ६१ हजार ८३१ संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तर खासगी लॅबसह २ लाख ४६ हजार ५८६ नमुने पाठवण्यात आले. त्यापैकी ४० हजार ८७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
 

 "