Fri, Sep 25, 2020 16:12होमपेज › Pune › पुण्यात पोलिस महासंचालकांच्या परिषदेत पंतप्रधानांची उपस्थिती

पुण्यात पोलिस महासंचालकांच्या परिषदेत पंतप्रधानांची उपस्थिती

Last Updated: Dec 07 2019 1:23PM
पुणे : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पुण्यात पोलिस महासंचालकांच्या परिषदेला सुरुवात झाली आहे. परिषदेचा आजचा दुसरा दिवस असून, पंतप्रधानांनी अनेक विषयांच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या परिषदेला भारतातील उच्च पोलिस अधिकारी उपस्थित आहेत. 

पुण्यातील बाणेर परिसरात ही परिषद सुरू आहे. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परिषदेचे उद्घाटन केले. नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून तंत्रज्ञानावर आधारित पोलिसिंग करणे हा देखील या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत पोलिस महासंचालकांची शिखर परिषद अतिशय महत्त्वाची मानली जाते. परिषदेला सुरक्षा क्षेत्रातील अतिवरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतात.

 "