Mon, Aug 03, 2020 14:58



होमपेज › Pune › ५० युसीएल किटची  मागणी

‘आधार’साठी वेळ वाचणार

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:45AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी    

सध्या शहरात आधार नोंदणींसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, त्यातील 70 ते 80 टक्के नागरिक आपल्या आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी येत आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ कमी लागावा म्हणून जिल्हा प्रशासनाने 50 बायोमेट्रिक डिव्हाइस (युसीएल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधारमधील दुरुस्तीचे काम केवळ  दोन ते तीन मिनिटात होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.

केंद्र शासनाने बँक खाते, गॅसचे अनुदान, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड आदींसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी सर्वच केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. आधार नोंदणी आणि दुरुस्ती ही एकाच मशिनद्वारे केली जात असून दोघांची एकच रांग लागत आहे. नवीन आधार नोंदणीसाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. दुरुस्तीसाठी सुध्दा संबंधित व्यक्तीचे थम्ब एम्प्रेशन घेण्यात येते.  

आधार कार्डमधील दुरुस्ती करणार्‍यांची संख्या 70 ते 80 टक्के एवढी आहे. तर नवीन नोंदणी करणारे केवळ 20 ते 30 टक्के आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आधारमधील दुरुस्ती बायोमेट्रिक उपकरणाद्वारे (युसीएल) दुरुस्त करण्यास युआयडीने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनने 50 बायोमेट्रिक डिव्हाइस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
या डिव्हाइसद्वारे आधारमधील दुरुस्तीचे काम केवळ दोन ते तीन मिनिटात होणार आहे. सध्या युसीएल डिव्हाइस हे मोबाईल कंपन्या मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी वापरत आहते. या पध्दतीने फक्त बोटांच्या ठशांद्वारे आधारमधील दुरुस्तीचे काम लवकर होण्यास मदत होणार आहे.