Tue, Jul 07, 2020 17:42होमपेज › Pune › ‘देवाक काळजी रे’ गाण्याची भोसरीतील राजकीय नेत्यांना भुरळ

‘देवाक काळजी रे’ गाण्याची भोसरीतील राजकीय नेत्यांना भुरळ

Published On: May 29 2018 1:35AM | Last Updated: May 28 2018 11:58PMपिंपरी : संजय शिंदे

होणारा होताला, जाणारा जाताला, मागे तू फिरु नको...
उगाच सोडून खर्‍याची संगत, खोट्याची धरु नका...
येईल दिवस तुझा ही माणसा, जिगर सोडू नको....
तुझ्या हाती आहे डाव सारा, इसर गजाल कालची रे...

देवाक काळजी रे...देवाक काळजी रे... या गाण्याने सध्या पिंपरी-चिंचवड खासकरुन भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांबरोबरच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भुरळ घातली आहे. या गाण्याच्या शब्दातून अनेक जण भविष्याच्या राजकारणासाठी तर काही जण सद्याची राजकीय स्वकारर्कीद गुंफण्याचा प्रयत्न करताना सोशल मीडियातून दिसत आहेत.

2014 च्या पराभवातून नव्याने उभे राहण्यासाठी माजी आ. विलास लांडे यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोबती रे तू तुझ्या, अन तुला तुझीच साथ, शोधूनी तुझी तू वाट, चाल एकला.., होऊ दे जरा उशीर, सोडतोस का रे धीर, रात संपता पहाट होइ रे पुन्हा, देवाक काळजी रे..देवाक काळजी रे... द्वारे व्हीडीओ तयार करुन काळजी करु नका तुमच्याबद्दल देवालाच काळजी रे असे अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तर विद्यमान आ. महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी ही या गाण्यातून आ. लांडगे यांच्या कारर्किदवर व्हिडीओ तयार करुन ‘देवाक काळजी रे..देवाक काळजी रे’ या गाण्यातून तुम्ही जो वसा घेतला आहे. तो नागरिकांच्या भल्याचा असल्याने तुमचे भविष्य उज्ज्वल आहे हे होणारा होताला, जाणारा जातला, मागे तू फिरू नको...उगाच सोडून खर्‍याची संगत खोट्याची धरु नको, येईल दिवस तुझा ही माणसा, जिगर सोडू नका.. तुझ्या हाती आहे डाव सारा, इसर गजाल कालजी रे..देवाक काळजी रे.. देवाक काळजी रे.. या कडव्यासह पूर्ण गाण्यातून तुम्ही पुढे चालत रहा देवाक काळजी रे..या व्हिडिओतून सोशल मीडियावर दर्शिविण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपाचे सहयोगी आ. महेश लांडगे हे पुन्हा विधानसभा लढविणार की, पक्षाच्या आदेशाने लोकसभेच्या मैदानात उतरणार; तर माजी आ. विलास लांडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेवर पुनर्वसन करणार की, त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जायला लावणार या चर्चेला उधाण आल्यामुळे लांडगे आणि लांडे यांचे कार्यकर्ते देवाक काळजी रे..देवाक काळजी रे... तून तुम्ही चालत रहा तुमची देवाला काळजी रे असे तरी जणू म्हणत नसतील ना अशी चर्चा भोसरी विधानसभा मतदारसंघात आहे.