पुणे : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने हंगाम २०१९-२० या वर्षात देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखान्यांठी वसंतदादा पाटील पुरस्कार पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला.कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि कुंभी कासारी या कारखान्यानाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एकूण २१ पुरस्कारांमध्ये ९ पुरस्कार मिळवित महाराष्ट्राने वर्चस्व राखले आहे. (Bhimashankar Sugar Factory is best in country and Jawahar Kumbhi Kasari of Kolhapur is one of them)
अधिक वाचा : LIVE शोमध्ये तरुणीच्या मागे दिसली मनुष्याच्या लिंगाची प्रतिकृती! (photos)
साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ हे उपस्थित होते.
अधिक वाचा : श्रद्धा कपूरची लगीनघाई सुरु? शक्ती कपुरांनी दिली महत्त्वाची माहिती!
उत्कृष्ठ ऊस उत्पादकतेसाठी (उच्च उतारा विभाग) प्रथम पारितोषिक हे सांगली जिल्ह्यातील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा, द्वितीय पारितोषिक सातारा येथील अजिंक्यतारा कारखाना, तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पारितोषिक पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी, द्वितीय पारितोषिक सांगली येथील क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारीस, उत्कृष्ठ वित्तीय व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार गुजरातमधील श्री नर्मदा खांड उद्योग तर द्वितीय पुरस्कार जालना येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी यांना जाहीर झाला.
अधिक वाचा : एकदा जर उद्रेक झाला तर थांबवणार कोण?; मराठा आरक्षण प्रश्नी उदयनराजेंचा इशारा
विक्रमी ऊस उतार्याचे पारितोषिक कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी, विक्रमी साखर निर्यातीचा प्रथम पारितोषिक कोल्हापूरमधील जवाहर सहकारी कारखान्यास तर द्वितीय पारितोषिक सातारा जिल्ह्यातील कराड येथील सह्याद्री सहकारी कारखान्यास जाहीर झाला.
अधिक वाचा : रक्षा खडसेंना भाजपच्या वेबसाईटवर अपशब्द; पण गुगल ट्रान्सलेटरवर 'रावेर' शब्दाचा 'तो' अर्थ होत नाही!
गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या परिसरात २६ मार्च रोजी पुरस्कार वितरण आणि जागतिक आव्हाने व भारतीय साखर उद्योगाला संधी या विषयावर चर्चासत्र होणार आहे. माजी केंद्रिय कृषिमंत्री खासदार शरद पवार, केंद्रीय अन्न राज्यमंत्री रावसाहेब दानवे व अन्य राज्यांचे मंत्री व साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी दांडेगांवकर यांनी सांगितले.