Mon, Aug 10, 2020 05:02होमपेज › Pune › भीमा कोरेगाव प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी : RSS

भीमा कोरेगाव प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी : RSS

Published On: Jan 03 2018 8:16AM | Last Updated: Jan 03 2018 8:16AM

बुकमार्क करा
पुणे : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दगडफेक व जाळपोळीच्या घटनेची आरएसएसने (राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ) निंदा केली आहे. आरएसएसचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्‍त केले आहे. तसेच दंगल भडकविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

आरएसएसने आपल्‍या ट्विटरवर एक पोस्‍ट शेअर केली आहे. त्‍यामध्ये म्‍हटले आहे की, ‘‘काही शक्‍ती  दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. राज्‍यातील नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्‍था राखावी. दंगल भडकवण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. भीमा कोरेगावची घटना अतिशय दु:खद आहे. आरएसएस या घटनेची तीव्र निंदा करत आहे.’’

दरम्‍यान, भीमा कोरेगाव येथे दोन  गटात झालेल्‍या वादाचे संपूर्ण राज्‍यत पडसाद उमटले आहेत. या जाळपोळीची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. तसेच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, त्‍यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  

संबंधित बातम्या

 

भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले?

भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

फूट पाडणाऱ्यांचा डाव हाणून पाडा : अशोक चव्हाण

घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री (Video)