पुणे : वाढीव वीज बील विरोधात भाजपचे आंदोलन (video)

Last Updated: Jul 03 2020 1:30AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक वीज बिलामध्ये वाढ केलेली आहे, याला भाजपचा विरोध आहे. ही वीज बिले अन्यायकारक असून, महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घेऊन लॉकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावी अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

वाचा :  सारथी संस्‍था बंद पडू देणार नाही : वडेट्टीवार (व्हिडिओ)

केंद्र सरकार पॅकेज देत असेल तर राज्य सरकारने एक नवा पैसा जनतेला दिला नाही. म्हणून सरकारने हे वीज बिल माफ करावे असेही ते पुढे म्हणाले. जून महिन्यामध्ये राज्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना ज्या पद्धतीने वाढीव बिलाची आकारणी करून वाटप करण्यात आले, त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने आज पुण्यातील रास्ता पेठ येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनी समोर आंदोलन करण्यात आले .

या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली, आणि वाढीव वीज आकारणी बिलाची होळी करून निषेध केला. यावेळी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा :पुणे : इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी १३ जण पॉझिटिव्ह