Sat, Jan 25, 2020 22:27
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › बारामती : महिला सरपंचाच्या पतीचा खून; संतप्त ग्रामस्थांनी पेटवली आरोपीची वस्ती

बारामती : महिला सरपंचाच्या पतीचा खून; संतप्त ग्रामस्थांनी पेटवली आरोपीची वस्ती

Last Updated: Jan 15 2020 7:04PM

आरोपीच्या घराला लागलेली आगपुणे : प्रतिनिधी

सोनगाव येथील सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात यांचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून झाल्याच्या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी सुमारे दीडशे ते दोनशे ग्रामस्थांच्या जमावाने सोनगाव जवळील भोसलेवस्ती येथे जावून खून प्रकरणातील संशयित पन्ना आनंदा भोसले याच्यासह वस्तीवरील घरांना आगी लावल्या. दरम्यान गावातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले असून मोठा पोलिस फौजफाटा गावामध्ये तैनात करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : बारामती : छेडछाड करताना जाब विचारल्याने महिला सरपंचाच्या पतीचा निर्घृण खून

युवराज थोरात यांचा बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गावातील सोनेश्वर मंदिराजवळ खून करण्यात आला. त्यामुळे संतप्त युवक आणि आरोपींनी गावाजवळील भोसलेवस्ती येथे जावून या प्रकरणातील संशयित पन्ना आनंदा भोसले याच्यासह वस्तीवरील अन्य घरे पेटवून दिली. सोनगावातील या वस्तीवर आगीचा डोंब उसळला आहे. दरम्यान थोरात यांचा मृतदेह बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. परंतु आरोपींना अटक केल्याशिवाय पोस्टमार्टेम करू देणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे.  त्यामुळे अद्याप शवविच्छेदन झालेले नाही. 

अधिक वाचा : 'जाणता राजा'वरून दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केला खुलासा! (video)

बारामतीत गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मंत्री येत आहेत. त्यामुळे येथील कृषी विज्ञान केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कृषी विज्ञान केंद्रही तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यांच्याच हद्दीत बुधवारी खूनाची घटना घडल्याने पोलिसांची मोठी पळापळ सुरु आहे.