Fri, Jul 03, 2020 00:53होमपेज › Pune › मान्सून दोन दिवसांत आंध्र किनारपट्टीला धडकणार  

मान्सून दोन दिवसांत आंध्र किनारपट्टीला धडकणार  

Last Updated: Jun 07 2020 12:27AM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा

मान्सून पुढे सरकण्यास शनिवारी पोषक स्थिती निर्माण झाली.  कर्नाटक, तामिळनाडूच्या आसपास थांबलेला मान्सून  गतिमान होऊ लागला आहे. शनिवारी मान्सूनने आगेकूच करीत संपूर्ण दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पाँडिचेरी, बंगालच्या उपसागरातील मध्य, पूर्व आणि पश्‍चिम भागापर्यंत मजल मारली.

दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून आंध— प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील पूर्व, मध्य भागापासून ते अंदमानाच्या समुद्रापर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. या स्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण आहे. शुक्रवारी तो कर्नाटकच्या किनारपट्टीवर स्थिर होता.

शनिवारी मात्र आगेकूच करीत तामिळनाडूनचा बहुतांश भाग काबीज करून दक्षिण कर्नाटकपर्यंत धडकला आहे. बंगालच्या उपसागरातील पूर्व, पश्‍चिम आणि मध्य भाग पार केला आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.