Sat, Oct 31, 2020 15:38होमपेज › Pune › 80 टक्के कोरोनाबाधितांना येत नाही वास

80 टक्के कोरोनाबाधितांना येत नाही वास

Last Updated: Oct 19 2020 2:08AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाबाधितांपैकी 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना विविध प्रकारचे वास ओळखणे अशक्य होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा अभ्यास पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे. हे संशोधन  हे संशोधन ‘दि लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि व भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसर) एक अभ्यास केला आहे. त्याद्वारेे एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना विविध प्रकारचे वास ओळखणे अशक्य होत असल्याचे आढळून आले आहे. हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ‘आयसर’ संस्थेने एक उपकरण विकसित केले आहे. बीजेमधील डॉ. समीर जोशी, डॉ. शिल्पा नाईक व डॉ. शशिकला सांगळे आणि ‘आयसर’मधील शास्त्रज्ञ डॉ. निक्सॉन अब—ाहम व संशोधक विद्यार्थी अनिंद्य भट्टाचार्य यांनी हे संशोधन केले आहे. कोरोनाचे लवकर निदान होण्यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे.

या संशोधनात लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांमधील वासाच्या जाणिवेची तीव—ता तपासली असता ती कमी जाणवली. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर वास येणे कमी होते, असे समोर आले आहे. पण वासाच्या कमी-अधिक जाणिवेतून कोरोनाचे निदान करणे, अद्याप शक्य झाले नसून, ते या संशोधनामुळे आता हे शक्य होणार आहे. 

या उपकरणाद्वारे केलेल्या अभ्यासातून जवळपास 80 टक्के लक्षणे नसलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाऊ शकतो. यामध्ये वासाची जाणीव न होऊ शकलेल्या रुग्णांची लगेच ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करता येईल. हे संशोधन अत्यंत मौलिक असून, पहिल्यांदाच अशा प्रकारे वास घेण्याच्या क्षमतेवरून कोरोनाच्या निदानावर अभ्यास झाला आहे, अशी माहिती कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोशी यांनी दिली.  

 असे झाले संशोधन

 - मसाले, फळे, फुले, चहा-कॉफी, तेल-दुग्धजन्य पदार्थ या सहा घटकांचे कमी-अधिक तीव—तेचे 10 गंध तयार केले.
- लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ससूनमध्ये सुरुवातीला मूळ वास देण्यात आला. 
- त्यामध्ये 85 टक्के रुग्णांना वासाची जाणीव होत असल्याचे आढळले, तर 15 टक्के रुग्णांना वास आला  नाही. 
- वासाची तीव्र कमी करीत नेल्यानंतर त्यांना वास अचूक ओळखता आला नाही, तर काहींना केवळ कशाचा तरी वास येतोय असे जाणवले.
80 percent of corona sufferers can not smell

 "