Sat, Oct 31, 2020 16:28होमपेज › Pune › पुणे : एका रात्रीत तीन अपघात, ८ जणांचा मृत्यू

पुणे : एका रात्रीत तीन अपघात, ८ जणांचा मृत्यू

Last Updated: Sep 21 2020 11:36AM

सहजपूर येथील अपघातात अपघातग्रस्त झालेली कारयवत : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे- सोलापूर महामार्गावर रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातांत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार लोक गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीच्या सुमारास हे अपघात झाले आहेत. चालकांचा बेफिकीरी पाऊस आणि खड्डे अपघातास जबाबदार ठरले आहेत. 

वाचा : ज्याचा वशिला त्यालाच आयसीयू, व्हेंटिलेटर!

वाखारी (ता. दौंड) येथील समाधान हॉटेल समोर महामार्गावर पायी चालणाऱ्या एका युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कासुर्डी (ता. दौंड) येथील शेरू ढाबा येथे एक कंटेनर चालक थांबला. त्याने आपल्या ताब्यातील वाहन बेफिरीने रस्त्यातच उभे केल्याने त्यास एका कारची मागून धडक बसली. यात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या ठिकाणी सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला. अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्यावर एक मोठा खड्डा पडलेला आहे. 

वाचा : पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही : गृहमंत्री देशमुख

या खड्ड्यात गॅस वाहक कंटेनरचे पुढील चाक गुंतल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेकडील रस्त्यावर गेला. त्यास त्या रस्त्याने जाणाऱ्या दोन कार या वाहनास धडकल्या. त्यात एकाचा जागीच तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. रात्रीच्या  सुमारास झालेल्या या तीनही अपघातांची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती. रात्रीच्या वेळी पावसाचा जोर अधिक असल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती.

वाचा : पुण्यात ३ हजार ६६७ नवे रुग्ण ६९  रुग्णांचा मृत्यू

 "