Fri, Oct 30, 2020 18:41होमपेज › Pune › बारामतीत एकाच दिवसात ६ पॉझिटिव्ह 

बारामतीत एकाच दिवसात ६ पॉझिटिव्ह 

Last Updated: Jul 04 2020 5:00PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी सहा कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यात कमालीची चिंता वाढली आहे. दरम्यान, तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३५ वर जावून पोहोचला आहे.

वाचा : राष्ट्रवादीला धक्का; पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्याचे कोरोनाने निधन

शहरातील एका राजकिय पदाधिकाऱ्याच्या मुलाला तसेच एका ज्येष्ठ वकिलाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय सावळ येथील एका बॅक कर्मचाऱ्याला तसेच जळोची अर्बन ग्राममधील आयटी अभियंत्याच्या संपर्कात आलेल्या काटेवाडीतील दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शहरातील तांबेनगर भागात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

वाचा : कोरोनापासून बचावासाठी चक्क सोन्याचा मास्क 

 "