Tue, Jul 07, 2020 18:01होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे ५ नवे रूग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे ५ नवे रूग्ण

Last Updated: May 14 2020 3:47PM
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, चर्‍होली, चिंचवड स्टेशन, आकुर्डी येथील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी (दि. १४) दुपारी स्पष्ट झाले. तर, पुण्यातील गाडीतळ येथील एका महिलेस कोरोना झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या १९३ झाली आहे.

२८ वर्षीय तरूण, २३ वर्षीय तरूणी, ४०, ५० व ५८ वर्षांची महिला यांना कोरोना झाला आहे. त्यांच्यावर वायसीएम, भोसरी व पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

तर, पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील एक कारोनाबाधित बरा झाल्याने त्याला आज घरी सोडण्यात आले. कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या १२४ झाली आहे. शहरातील रूग्णालयात ५७ जणांवर तर, पुण्यातील रूग्णालयात ६ जणांवर उपचार सुरू आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.