Sun, Sep 20, 2020 02:39होमपेज › Pune › पुण्यात ४ हजार ६५६ नवे रुग्ण ७४ रुग्णांचा मृत्यू

पुण्यात ४ हजार ६५६ नवे रुग्ण ७४ रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Sep 17 2020 12:59AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात आज कोरोनाचे 4 हजार 656 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 2 हजार 120, तर पिंपरी-चिंचवडमधील 1 हजार 104 रुग्णांचा समावेश आहे, तसेच पुणे शहर 43 आणि पिंपरी-चिंचवडमधील 12  जणांसह 74 बाधितांचा मृत्यू झाला.  दरम्यान, दिवसभरात 3,505 जणांना डिस्चार्ज मिळाला.

पुणे शहरात बुधवारी ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी 7,162 संशयितांचे नमुने घेण्यात आले. आतापर्यंत 5 लाख 50 हजार 108 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण 1,24,568 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,883 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आतापर्यंत 1,03,978 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 17,672 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 3,453 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सध्या 936  रुग्ण गंभीर असून, त्यापैकी 480 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 2,918 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 104 रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 66 हजार 483 झाली असून, 6 हजार 415 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 3 हजार 202 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले; तर 119 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या 1 हजार 71 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे येथील बरे झालेल्यांची संख्या 55 हजार 853 झाली आहे. चिंचवड, चिखली, कोकणेनगर, सांगवी, तळवडे, पिंपरी, संत तुकारामनगर-पिंपरी, भोसरी, दापोडी येथील रहिवासी असलेल्या 12 रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी नोंद झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 1 हजार 77 झाली आहे; तर शहराबाहेरील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 "