Fri, Nov 27, 2020 10:46होमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेतील ३४ हजार जागा अद्याप रिक्तच

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेतील ३४ हजार जागा अद्याप रिक्तच

Last Updated: Nov 23 2020 1:28AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 81 हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार (दि. 23) शेवटची संधी असून, अद्याप प्रवेशाच्या 33 हजार 997 जागा रिक्तच आहेत. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवरील राखीव प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशासाठी 17 मार्च रोजी पहिली लॉटरी काढली आहे. या लॉटरीत ज्या मुलांचे आरटीईअंतर्गत प्रवेश जाहीर झाले अशा मुलांचे 27 सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात आले. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत आणि पुढे मुदत वाढवून 23 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा राहिल्या असून, 34 हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याचे दिसून येत आहे.