Sat, Jul 11, 2020 10:19होमपेज › Pune › पुण्यात कोरोनाचे 29 बळी

पुण्यात कोरोनाचे 29 बळी

Last Updated: Jul 01 2020 8:03AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात मंगळवारी 613 रुग्ण आढळून आले असून, दिवसभरात 29 जणांचा मृत्यू झाला. त्यातील पुणे शहरात 486; तर पिंपरीमध्ये 127 नवीन रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये पुण्यातील 25 तर पिंपरीतील चार जणांचा समावेश आहे. 

शहरात मंगळवारी पुणे व पिंपरी चिंचवडमधील मृतांमध्ये बोपोडी येथील महिला ( 55), पर्वती येथील पुरूष (70), येरवडा येथील पुरूष (69), रास्तापेठ येथील पुरूष (75), गुरूवारपेठ येथील पुरूष (52), खराडी येथील पुरूष (67), शिवाजीनगर येथील महिला (60), कर्वेरोड येथील महिला (74), कोंढवा येथील महिला (50), एरडंवणे येथील पुरुष (76), गोखलेनगर येथील पुरूष (74), शिवाजीनगर येथील पुरुष (74), सानेगुरूजीनगर  येथील पुरूष (57), मंगळवारपेठ येथील पुरूष (48), शुक्रवारपेठ येथील पुरुष (46) बिबवेवाडी येथील पुरूष (64), एरडंवणे येथील पुरुष (83), फुरसुंगी येथील पुरूष (57), हडपसर येथील महिला (59), नानापेठ येथील पुरुष (75), वडगावशेरी येथील महिला (58), गणेशमळा येथील महिला (63), कात्रज येथील पुरुष (73), कोंढवा येथील पुरूष (54), श्रमीक वसाहत येथील महिला (69), तर पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब नगर, चिंचवड येथील पुरुष (35), इंदिरानगर, चिंचवड येथील पुरुषा (75), इंदिरानगर, खडकी बाजार येथील महिला (59) आणि मुलुंड, मुंबई येथील पुरुष (58) यांचा  समावेश आहे.

शहरात दिवसभरात 3 हजार 949 संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकुण 10 हजार 451 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 350 रुग्ण अत्यावस्थ असून, त्यापैकी 59 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातील एकूण बाधीतांची संख्या 17 हजार 228 असून त्यांच्यापैकी 10 हजार 451 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 6 हजार 134 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी पुणे शहरातील 522 जणांना आणि पिंपरी-चिंचवडमधील 145 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.