Fri, Sep 18, 2020 12:16होमपेज › Pune › पुण्यात २३३१ नवे रुग्ण

पुण्यात २३३१ नवे रुग्ण

Last Updated: Aug 06 2020 1:21AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात आज कोरोनाचे 2331 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी पुणे शहरातील 1101 तर पिंपरी चिंचवडमधील 798 रुग्णांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच पुणे शहरातील 17 आणि पिंपरी चिंचवडमधील 16 जणांसह एकूण 33 रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला.  दरम्यान 3500 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. 

पुणे शहरात नेहमीच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या आणि मृत्यूदेखील घटल्याचे बुधवारी दिसून आले. ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी बुधवारी 5,698 संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर आतापर्यंत 2 लाख 97 हजार 737 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1101 नमुने आज पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत 60,597 नमुने अर्थात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिवसभरात आज 1159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या 42,410 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध कोविड केअर सेंटर, रुग्णालयांत आणि घरी 16,758 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 675 रुग्ण गंभीर असून, 425 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. उपचारादरम्यान बुधवारी पुणे शहरात 17  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 11 पुरुष तर 6 महिला आहेत. या मृतांचे वय 41 ते 80 च्या दरम्यान होते. मृत रुग्ण हडपसर, भवानी  पेठ, धायरी, येरवडा, नाना पेठ, धनकवडी, हिंगणे खूद, आंबेगाव, मोहम्मदवाडी, रामटेकडी, शिवणे, कोंढवा आणि विश्रांतवाडी येथील रहिवाशी होते. त्यापैकी बहुतेक रुग्णांना उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आदी जोखमीचे आजार होते. आतापर्यंत शहरातील एकूण मृतांची संख्या 1429 वर पोचली.

पिंपरी-चिंवड शहरात कोरोनाचे 798 नवे रूग्ण आढळले असून, एकूण संख्या 25,425 झाली आहे. त्यापैकी बरे झालेल्या 301 रूग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 17,407 बरे झाले आहेत. सध्या सक्रिय 3,970 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी 1,419 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तर पुनावळे, दापोडी, भोसरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, मोशी, सांगवी, निगडी, पिंपरी, आकुर्डी, किवळे, चाकण येथील 16 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 521 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 "