Wed, Aug 12, 2020 13:16होमपेज › Pune › बारामती तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर 

बारामती तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर 

Last Updated: Jun 04 2020 6:29PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा

कोरहाळे बुद्रूक (ता. बारामती) येथील कोरोनाबाधित ९० वर्षीय त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पत्नीचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता २० वर पोहोचली आहे.

वाचा :  बाधितांनी ओलांडला सात हजारांचा टप्प्पा

कोरहाळे बुद्रूक येथील एका ज्येष्ठ व्यक्तीला कोरोना झाल्याचे मंगळवारी (दि.२) रोजी स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या हायरिस्कमधील १२ जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेत त्यांची कोरोना चाचणी घेतली. त्यात या रुग्णाच्या पत्नीचा अहवाल कोरोना बाधित असा आला आहे. अन्य ११ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. कोरहाळ्यातील एका वस्तीवर राहणाऱ्या अन्य एका तरुणाचाही स्वॅब गुरुवारी घेण्यात आला आहे. याशिवाय पुण्याला जावून आलेल्या अन्य आठ जणांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

दरम्यान, तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २० वर गेला आहे. यात दोघा ज्येष्ठांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

वाचा : पुणे : 'निसर्ग' चक्रीवादळाचा ओतूरला फटका