Fri, Sep 18, 2020 18:14होमपेज › Pune › पुणे : झाड पडून मृत्यूमुखी पडलेल्या पीएमपी चालक नवघणेंना दोन लाखांची मदत 

पुणे : झाड पडून मृत्यूमुखी पडलेल्या पीएमपी चालक नवघणेंना दोन लाखांची मदत 

Last Updated: Oct 10 2019 3:00PM

पुणे : झाड पडून मृत्यू झालेले पीएमपी चालक नवघणे यांचे पार्थिव पीएमपीएमएल कार्यालयामध्येपुणे : प्रतिनिधी

चालक विजय नवघणे यांचा मृत्यू हा गलथान कारभारामुळे झाला असून याला सर्वस्वी जबाबदार पीएमपीएमएल प्रशासन आहे. त्यामुळे नवघणे यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचे पार्थिव थेट पीएमपीएमएल मध्ये आणण्यात आले होते. 

संतप्त कुटुंबीयांकडून कार्यालयामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. पीएमपीएमएलच्या अध्यक्ष नयना गुंडे यांनी नवघणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पीएमपीएमएलकडून तातडीचे दोन लाखांची मदत जाहीर केली. याचबरोबर दीनदयाळ अपघात विमा योजनेतून मदत देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांच्या मुलाला देखील पीएमपीएमएल मध्ये कामाला घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

नैसर्गिक आपत्ती मदत मिळून देणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. त्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी नवघणे यांचे पार्थिव कार्यालयातून बाहेर काढून घरी नेले. दुपारी धनकवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.