Tue, Aug 04, 2020 14:14होमपेज › Pune › पुण्यात 1442 नवीन रुग्ण; 21 जणांचा मृत्यू

पुण्यात 1442 नवीन रुग्ण; 21 जणांचा मृत्यू

Last Updated: Jul 07 2020 1:34AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन 1442 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 861 रुग्ण पुणे शहरातील असून, पिंपरीचिंचवडम ध्ये 581 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत पुण्यातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. दरम्यान, सोमवारी पुण्यातील 15, पिंपरीत 3 तर ग्रामीण व कॅन्टोन्मेंटमध्ये 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आतापर्यंत 1 लाख 37 हजार 364 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी पुणे शहरातील 4,284 संशयितांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले; तर 264 जणांचे नमुने अँटीजेन टेस्टसाठी घेण्यात आले. त्यापैकी 861, तर आतापर्यंत 22 हजार 381 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

सोमवारी 730, तर आतापर्यंत 13 हजार 739 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 7 हजार 912 रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह रुग्ण) उपचार घेत आहेत. त्यापैकी ससूनसह विविध रुग्णालयांमध्ये 368 गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

यापैकी 304 रुग्ण ऑक्सिजनवर असून, त्यापैकी 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरात उपचारादरम्यान सोमवारी 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 14 पुरुष तर 1 महिला आहे. या मृतांचे वय 50 ते 83 च्या दरम्यान होते. हे रुग्ण शनिवार पेठ, मंगळवार पेठ, संगमवाडी, येरवडा, फुरसुंगी, बिबवेवाडी, सोलापूर रोड, कोंढवा आणि सेनापती बापट रोड येथील रहिवासी होते.

त्यांपैकी बहुतेकांना न्यूमोनिया, तीवजए श्‍वसनविकार, उच्च रक्‍तदाब झालेला होता. आता शहरातील मृतांची संख्या ही 730 वर पोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे नवीन 581 नवे रुग्ण आढळले असून, एकूण संख्या 4,965 झाली आहे. 14 संशयितांना वायसीएम, भोसरी व इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, 209 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनातून बरे झालेल्या 363 जणांना घरी सोडण्यात आले. तसेच, पिंपरी येथील पुरुष (64), चिखली येथील महिला (62) आणि चाकण येथील पुरुष (50) या तिघांचा मृत्यू झाला.