Tue, May 26, 2020 14:33होमपेज › Pune › यशवंत व्हा!; उद्यापासून बारावीची परीक्षा

यशवंत व्हा!; उद्यापासून बारावीची परीक्षा

Last Updated: Feb 18 2020 1:44AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

करिअरचे अनेक पर्याय खुले करणारी बारावीची परीक्षा उद्यापासून (दि.18 ) सुरू होत आहे. राज्यातील 3 हजार 36 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून या वर्षी पंधरा लाख पाच हजार 27 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डा. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदेत ही माहिती दिली. 

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडणार आहे.  या परीक्षेसाठी राज्यभरातून 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे. यामध्ये 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. राज्यातील एकूण 9 हजार 923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. 

परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय प्रत्येक जिल्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. एक महिलांचे भरारी पथक असणार आहे. तसेच महापालिकेचे पण भरारी पथक नेमण्यात आले आहे. भरारी पथकांना ऐनवेळी विभागीय मंडळाकडून सकाळी कळवण्यात येणार आहे. यंदा परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह केंद्रसंचालक यांना परीकशा काळात मोबाईल वापरण्यास बंदी असणार आहे. पेपर व्हायरल होण्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाने परीक्षा केंद्र चालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. 

त्याचबरोबर विद्यार्थांनी मंडळाने जाहीर केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. काळे यांनी यावेळी केले.

शाखा निहाय नोंदणी केलेले विद्यार्थी

विज्ञान 5,85,736
कला 4,75,134
वाणिज्य 3,86,784
किमान कौशल्य 57,373

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी वाटल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाइन सुरू आहे. त्यांचे विभागीय क्रमांक : पुणे (020) 7038752972, मुंबई (022) 27881075, 27893756, कोल्हापूर (0231) 2696101, 2696102, 2696103, अमरावती (0721) 2662608, लातूर ( 02382) 251733, कोकण ( 02352) 228480, नाशिक (0253) 2592141, 2592143,  नागपूर (0712) 2565403, 2553501, औरंगाबाद (240) 2334228, 2334284. याशिवाय राज्य मंडळाचीदेखील हेल्पलाइन आहे. त्याचे क्रमांक : 020 25705271, 25705272.