Sat, Oct 24, 2020 09:03होमपेज › Pune › पुण्यात १ हजार ५०९ नवे रुग्ण

पुण्यात १ हजार ५०९ नवे रुग्ण

Last Updated: Sep 22 2020 1:35AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात सोमवारी कोरोनाचे 1 हजार 509  नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील  854,  तर पिंपरी चिंचवडमधील 655  रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुणे शहरातील 37 आणि पिंपरी-चिंचवडमधील 11 अशा एकूण 48 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात सोमवारी आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणीसाठी 2,697 संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर आतापर्यंत 5,77,629  जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात एकुण 1,32,665 पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,256 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,12,172  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 17,372  सक्रिय रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 3,536 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 952 रुग्ण गंभीर असून त्यापैकी 492 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरातील मृतांची एकूण संख्या 3,121 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे नवे 655 रुग्ण आढळून आले. बाधितांची एकूण संख्या 70 हजार 827 झाली असून, सक्रिय 5 हजार 212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 2 हजार 644 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.  कोरोनातून बरे झालेल्या 1 हजार 122 रुग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 61 हजार 90 झाली आहे. 98 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. आकुर्डी, भोसरी, थेरगाव, नेहरूनगर, खराळवाडी, प्राधिकरण-निगडी, सांगवी  येथील रहिवासी असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 153 रुग्ण मरण पावले आहेत, तर शहराबाहेरील 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

 "