Fri, Sep 25, 2020 12:55होमपेज › None › पुलवामा शहिदांसाठी शाहरुखचा खास व्हिडिओ

पुलवामा शहिदांसाठी शाहरुखचा खास व्हिडिओ

Published On: Aug 14 2019 1:33PM | Last Updated: Aug 14 2019 12:53PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी एक व्हिडिओ 'तू देश मेरा' तयार केला जात आहे. या व्हिडिओमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सचा समावेश आहे. या यादीत शाहरुख खानचेही नाव जोडले गेले आहे. बिझी शेड्यूल असतानाही शाहरूखने मागील आठवड्यात या ४ मिनिटांच्या व्हिडिओसाठी शूट केले. 

या व्हिडिओसाठी १४ सेलेब्सना ॲप्रोच करण्यात आले होते. त्यात अमिताभ बच्चन, आमिर खान आणि रणबीर कपूर यांसारख्या स्टार्सचा समावेश होता. सीआरपीएफचे महासंचालक मोसेस दिनाकरण यांनी म्हटले आहे, 'ही आमच्याकडून हिरो आणि शहीदांना श्रद्धांजली आहे. संपूर्ण देश आमच्यासोबत विश्वासाने एकत्रपणे उभा आहे. सेलेब्रिटीदेखील सहभागी झाले, कौतुकास्पद आहे आणि मनाला भावणारे आहे.'

व्हिडिओमध्ये शाहरुखचे शूटिंग असणारा भाग मुंबईच्या महबूब स्टुडिओमध्ये अर्ध्या रात्री शूट करण्यात आला. आतापर्यंत हे व्हिडिओ सॉन्ग कधी लॉन्च होणार याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रॉडक्शन हाऊसच्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनी या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे.

हा व्हिडिओ सीआरपीएफ डेच्या औचित्याने शेड्यूल केले जाणार होते. परंतु, नंतर रिशेड्यूल करण्यात आले. या गाण्याला मुख्यत्वे जावेद अली, जुबिन नौटियाल, शाबाब साबरी आणि कबीर सिंह यांनी गायले आहे. परंतु, शाहरुखबरोबरच काही स्टार्सनीही गाण्यासाठी आवाज दिला आहे. व्हिडिओच्या शूटिंगमध्ये १५० हून अधिक सीआरपीएफच्या जवानाचा समावेश आहे.