Tue, Jul 07, 2020 05:42होमपेज › None › विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश भावूक

विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश भावूक

Last Updated: May 26 2020 4:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मंगळवार (दि. २६) रोजी रितेश देशमुखने एक भावूक व्हिडिओ शेअर करून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. 

रितेश देशमुखच वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज ७५ वा जन्मदिवस आहे. या औचित्याने रितेशने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो भावूक झाल्याचे दिसत होता. आपल्या वडिलांचे कपडे हातात घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देत असल्याचे तो व्हिडिओमध्ये दिसतो आहे. 

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर रितेशचे फॅन्सदेखील भावूक झाले आहेत. विलासराव देशमुख यांची आठवण त्याने काढत कॅप्शन लिहिली आहे, 'हॅप्पी बर्थडे पापा, मी तुम्हाला रोज मिस करतो.' 

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन २०१२ मध्ये झाले होते. 

याआधीही रितेशने आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोत विलासराव देशमुख देखील दिसत होते. तर लहान रितेश खाण्यात मग्‍न असलेला दिसतो. या फोटोसोबत रितेशने एक कॅप्शनही लिहिली होती, 'या फोटोतील तो मी आहे. त्यावेळी मी माझ्या वडिलांसोबतच्या राजकीय बैठकीत खाण्यात बिझी होतो. त्यावेळी मला राजकीय बैठकीची कसलीही कल्पना नव्हती.'