Thu, Sep 24, 2020 10:04होमपेज › None › 'ड्युटी फ्री'मधूून दारु सिगारेट खरेदीवर मर्यादा!

'ड्युटी फ्री'मधूून दारु सिगारेट खरेदीवर मर्यादा!

Last Updated: Jan 20 2020 1:52AM

संग्रहित छायाचित्रपुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली

विमानतळावरील शुल्क मुक्त (ड्युटी फ्री) दुकानातून प्रवाशांना केवळ एकच मद्याची बॉटल खरेदी करता येईल. अनावश्यक वस्तूंच्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने ही बंधने घालण्याची तयारी सुरु केली आहे. 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार्‍या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना वाणिज्य मंत्रालयाकडून हा सल्ला देण्यात आला आहे. ड्यूटी फ्री दुकानातून सिगारेटचे एक कार्टन खरेदी करण्याची सुविधा बंद करण्याचा सल्ला देखील मंत्रालयाने दिला आहे. सध्या विदेशातून येणार्या प्रवाशांना विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानातून दोन लीटर मद्य तसेच सिगारेटचे एक कार्टन खरेदी करण्याची मुभा आहे. 

अधिक वाचा : गेल्या सहा वर्षात किती हजार पाकिस्तानी झाले भारतीय?

विदेशातील अनेक विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना जास्तीत जास्त एक लीटर मद्य खरीदीची मुभा आहे. देशातही आता हा निर्णय घेतला जावू शकतो. अनावश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणार्या विविध् उपायांच्या पार्श्वभूमिवर वाणिज्य मंत्रालयाचा सल्ला महत्वाचा आहे. अनावश्यक वस्तूंच्या आयातामूळे देशाचा व्यापार घटत आहे, त्यामुळे केंद्र सरकारने ही पाऊले उचलली आहेत. 

अधिक वाचा : जम्मू : बेसुमार संपत्तीचा मालक डीएसपी देविंदर सिंगला सरकारी पगारापेक्षा अतिरेक्यांकडून मुबलक पैसा!

आयात शुल्कात वाढ होण्याची शक्यता 

विदेशी प्रवाशांना विमानतळावरील ड्यूटी फ्री दुकानातून जवळपास 50 हजार रुपयांपर्यंत साहित्य खरेदी करता येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार वाणिज्य मंत्रालयाने मेक इन इंडिया ला प्रोत्साहन मिळावे तसेच उत्पादन वाढीला वेग देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात कागद, चप्पला, बूट, रबराचे साहित्य आणि खेळण्यांवर आयात शुल्क वाढवण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने फर्निचर,रसायन, रबर, कोटेड कागद तसेच पेपर बोर्ड सह विविध क्षेत्रातील जवळपास 300 हून अधिक सामानावर आयात शुल्क दर वाढीचा प्रस्ताव दिला आहे. 

 "