Fri, Dec 13, 2019 01:19होमपेज › None › राफेलला लिंबू; शरद पवार म्हणतात...

राफेलला लिंबू; शरद पवार म्हणतात...

Last Updated: Oct 10 2019 4:30PM

शरद पवारनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दसऱ्याच्या मुहूर्त साधत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिस येथे जाऊन राफेलचे पहिले लढाऊ विमान घेतले. दरम्यान राजनाथ सिंह यांनी राफेलची खंडेनवमीला पुजा केल्याने वादंग निर्माण झाले. माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवण्याचा चांगलाच समाचार घेतला. 

यावर पवार यांनी देश हितासाठी राफेलसारखी विमाने विकत घेणे याबाबत काहीच हरकत नाही. परंतु, मला जे वाचावयास मिळाले ते कितपत खरे आहे हे मला माहित नाही. एखाद्याने ट्रक खरेदी केल्यावर लिंबू मिरची लावल्याप्रमाणे देशाच्या संरक्षणार्थ आणलेल्या विमानालाही लिंबू बांधल्याचे प्रकार घडत असतील तर यावर आपण काय बोलणार. आपल्याकडे शब्द नाहीत असे पवार म्हणाले.   

२०१६ साली राफेलच्या ३६ विमानांचा करार फ्रान्सने भारतासोबत केला. त्यामधील पहिले विमान भारताला मिळाले. या राफेलवरुन लोकसभा निवडणुकीवेळी यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. या राफेल लढावू विमानात मिटिऑर आणि स्काल्प ही क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता या विमानात आहे. त्यामुळे भारताच्या हवाईदलाची ताकत आणखी वाढणार आहे.

राफेलला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवणे हे जरा अतीच झाले आहे. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा प्रकार असल्याचे काहींनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियवर लिंबू प्रकरणावरुन बरीच खळबळ सुरु आहे.