Sat, Dec 05, 2020 01:43होमपेज › None › मिर्झापूर- २ वेबसीरिजवर मिर्झापूर खासदारांचा गंभीर आरोप

मिर्झापूर- 2 वेबसीरिजवर मिर्झापूरच्या खासदारांनी केला आरोप, म्हणाले....

Last Updated: Oct 24 2020 7:48PM
लखनौ : पुढारी ऑनलाईन

मिर्झापूर २ वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियात यावर जोरदार चर्चा सुरू आहे. परंतू या वेब सीरिजमुळे निर्माता आणि दिग्दर्शकांची डोकेदुखी वाढू शकते. माजी केंद्रीय मंत्री आणि मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी मिर्झापूर सीरिजच्या कंटेंटवर आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी ट्विट करत मिर्झापूर शहराला विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरू आहे. या भागाची खासदार या नात्याने या वेब सीरिजवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले.

मिर्झापूर शहराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. परंतु मिर्झापूर वेब सीरिजच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याचबरोबर जातीय असमानतेची भिंतही उभारली जात आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या सीरिजची चौकशी करुन त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

मिर्झापूर २ ही वेब सीरिज मिहिर देसाई आणि गुरमीत सिंह यांनी दिग्दर्शित केली आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्‍येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, राजेश तैलंग, श्रिया पिळगावकर, रसिका दुग्गल, लिलीपूट, कुलभूषण खरबंदा यासारख्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.