Wed, Dec 02, 2020 08:04होमपेज › None › उन्नाव प्रकरणाची सुनावणी एम्समध्ये

उन्नाव प्रकरणाची सुनावणी एम्समध्ये

Published On: Sep 11 2019 10:13PM | Last Updated: Sep 11 2019 10:13PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

उन्नाव बलात्कार प्रकरणी पिडीतेची साक्ष नोंदविण्यासाठी नवी दिल्लीताल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तात्पुरते न्यायालय सुरू करण्यात आले आहे. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा हे एम्स रूग्णालयातच पिडीतेची साक्ष नोंदवून घेणार आहेत. 

उन्नावमधील अल्पवनयीन मुलीवर २०१७ साली बलात्कार करण्यात आला होता. भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार कुलदीप सेंगर याच्यावर पिडीतेने बलात्काराचा आरोप केला आहे. सेंगरविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पीडितेच्या कुटूंबियांवर हल्ला होणे, धमक्या मिळणे असे प्रकार घडले होते. 

सदर घटनेची सरन्यायाधीशांनी गंभीर दखल घेत खटला दिल्ली येथे हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पिडीतेवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. 

खटल्याचे कामकाज सुरू करण्यासाठी गरज भासल्यास रुग्णालयातच सुनावणी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायलयाने म्हटले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार बुधवारी एम्समध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा रुग्णालयातच पिडीतेची साक्ष नोंदवून घेणार आहेत.