Tue, Aug 11, 2020 20:50होमपेज › None › जिओ कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे...

जिओ कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे...

Last Updated: Oct 09 2019 8:35PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. आता यापुढे रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी नॉन जिओ नेटवर्वर कॉलिंग करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. १० ऑक्टोंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे. 

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये अनेक दिवसांपासून ‘इंटरकनेक्ट यूजेस चार्ज’वरून वाद चालू होता. ट्रायने इंटरकनेक्ट चार्ज शून्य करावेत अशी रिलायन्स जिओची मागणी होती. मात्र, ट्रायने अद्यापही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिओने मोठा निर्णय घेत नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ग्राहकांना मिनिटाला ६ पैसे मोजावे लागतील असे जाहीर केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १० ऑक्टोंबर म्हणजेच उद्यापासूनपासून ते १ जानेवारी २०२० पर्यंत होणार आहे. 

रिलायन्स जिओ व्यतिरिक्त दुस-या नेटवर्कवर कॉल करयचा असेल तर, जिओच्या ग्राहकांना आता अतिरिक्त आयसीयु टॉपअप करावा लागणार आहे. मात्र, जिओ टू जिओ तसेच लँडलाइनवर कॉलिंगमोफत राहणार आहे. 

जिओकडून दिलेल्या माहितीनुसार, ट्रायकडून जो पर्यंत टर्मिनेशन चार्ज शुन्य केला जात नाही तो पर्यंत जिओच्या ग्राहकांना कॉलिंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.