Sat, Sep 19, 2020 08:35होमपेज › None › गणेशउत्सव2020 - ॥ श्री ज्ञानदेवाची आरती ॥

॥ श्री ज्ञानदेवाची आरती ॥

Last Updated: Aug 12 2020 10:46AM

श्री ज्ञानदेवआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत मनु वेधला माझा
॥ आरती ॥धृ.॥
लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी
॥ आरती ॥1॥
कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरही साम गायन करी
॥ आरती ॥2॥
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचि केले
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले
॥ आरती ॥3॥

 "