Wed, Sep 23, 2020 02:38होमपेज › National › मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा 

मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा 

Last Updated: Jul 01 2020 11:25AM
कन्नौज (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका कुटुंबाने मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आहे. यानंतर कुटुंबातील सर्व लोकांना शेजाऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील कन्नौज या गावात घडली आहे. 

एका वृत्तानुसार या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, एका कुटुंबातील लोकांनी मेंथीची भाजी समजून गांजाची भाजी खाल्ली. यानंतर सर्वजण अचानक आजारी पडले. या सर्व सदस्यांना दवाखान्यात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर यातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

वाचा : जम्मू- काश्मीर- राजौरीत एक दहशतवादी ठार 

कन्नौज येथील कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने नितेशला वाळलेली मेंंथीची भाजी म्हणून गांजा दिला. नितेशने तो गांजा घरी नेवून दिला. यानंतर त्यांची भाजी बनवून कुटुंबाने खाल्ली. यानंतर सर्वांची तब्येत बिघडली. या घटनेत ओमप्रकाश, नितेश, मनोज कमलेश, पिंकी आणि आरती असे पाच जण बेशुद्ध पडले. यानंतर काही वेळाने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी नवल किशोर याला अटक केली आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. यातील उरलेला गांजाही ताब्यात घेतला आहे.

वाचा : देशात २४ तासांत ५०७ जणांचा कोरोनाने मृत्यू

तपासादरम्यान गावातल्या एका व्यक्तीने विनोद करण्याच्या उद्देशाने कुटुंबाला गांजा दिला असल्याचे निर्दशनास आले आहे. 

 "