Wed, Sep 23, 2020 01:23होमपेज › National › व्हॉट्सॲप वापरताय, तर मग ही बातमी वाचाच!

व्हॉट्सॲप वापरताय, तर मग ही बातमी वाचाच!

Last Updated: Jul 14 2020 12:22PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावर सध्या व्हॉट्सॲप हे जास्त लोकप्रिय आहे. पण आता व्हॅाट्सॲप युजर्सना धोका आहे. व्हॅाट्सॲपचे बनावट ॲप व्हर्जनबद्दल युजर्संना सतर्क केले जात आहे. व्हॉट्सॲप बाबतीत बातम्या आणि अपडेटचा मागोवा घेणारी वेबसाईट WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या मॉडीफाईड व्हर्जन विषयी इशारा दिला आहे. WAbetaInfo ने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की व्हॅाट्सअॅपच्या मॉडीफाईड व्हर्जनला उत्तम गोपनीयता आणि सुरक्षेसाठी यापेक्षा चांगला पर्याय म्हणता येणार नाही. व्हॉट्सॲप चे मॉडीफाईड व्हर्जन आकर्षक आहे, पण हे एवढेही चांगले नाही की त्यासाठी कसलीही रिस्क घेऊ.

वाचा : विकास दुबेने राहुल तिवारीला केली होती मारहाण, २ जुलैपासून बेपत्ता

मॉडीफाईड व्हॉट्सॲपद्वारे हॅकर्स सहज युजर्संना आपला शिकार बनवू शकतात. हे फेक व्हॉट्सॲप डेव्हलपर्स मेन इन द मीडल (MITM)  हल्ल्यांमधून हॅकर्स डेटा चोरू शकतात. या हल्ल्याच्या मदतीने हॅकर सॉफ्टवेअरला एडिट करुन चॅटींग एक्सेस करु शकतात. आणि मेसेज वाचू शकतात. तसेच त्याला एडिट ही करु शकतात. 

व्हॉट्सॲपच्या मॉडीफाईड व्हर्जनची कंपनीने पडताळणी केलेली नाही. त्याचबरोबर जर कोणता युजर याचा वापर करत असेल तर त्याचं व्हॉट्सॲप अकाउंट बॅन केल जावू शकतं. असेही त्यात म्हटलं आहे. बऱ्याचवेळा युजर्स जास्त फीचर्स मिळवण्याच्या लालसेपोटी ओरीजनलच्या बदल्यात फेक व्हर्जन वापरतात. हे ॲप हे सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल चांगले नाही. व्हॉट्सॲपचे अधिकृत व्हर्जन ॲपल ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येते. 

वाचा : 'कोरोनाची साखळी तोडण्यास अपयश, या आठवड्यात देशातील आकडा १० लाख पार होईल'

 "