Fri, Sep 18, 2020 13:38होमपेज › National › 'या' तारखेपासून सुरू होईल वैष्णो देवी यात्रा

'या' तारखेपासून सुरू होईल वैष्णो देवी यात्रा

Last Updated: Aug 05 2020 11:49AM
जम्मू : पुढारी ऑनलाईन 

जम्मू-काश्मीर प्रशासनाने अनलॉक-३ मध्ये एक मोठा निर्णय घेत जम्मू-काश्मीरमध्ये मागील ५ महिन्यांपासून बंद असलेली सर्व धार्मिक स्थळे १६ ऑगस्टपासून खुली करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रसारानंतर जम्मू स्थित माता वैष्णो देवी मंदिर भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील सर्व धार्मिक स्थळे १८ मार्चपासून बंद करण्यात आली होती. 

रिपोर्टनुसार, माता वैष्णो देवीची यात्रा सुरू करण्यासाठी कोणतेही वेगळे निर्देश दिले गेलेले नाही. सूत्रांच्या हवाल्यानुसार, १६ ऑगस्टपासून माता वैष्णो देवीची यात्रा सुरू होईल. मर्यादित भाविकांना येथे जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासंदर्भात श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्ड निर्देश जारी करणार आहे.
 

 "