Wed, May 27, 2020 03:30होमपेज › National › ट्रम्प 'ताजमहल'च्या प्रेमात; दर्शन घेतल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये लिहिले....

ट्रम्प 'ताजमहल'च्या प्रेमात; दर्शन घेतल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये लिहिले....

Last Updated: Feb 24 2020 6:50PM
आग्रा (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी आज, सोमवारी ताजमहलचे दर्शन घेतले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प आणि जावई जारेद कुशनर यांनी देखील ताजमहलला भेट दिली.

वाचा : #TrumpInIndia : हैदराबाद हाऊसमध्ये भारत-अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय चर्चा

प्रेमाचे प्रतिक आणि जागतिक आश्चर्य असलेल्या ताजमहलचे दर्शन घेतल्यानंतर ट्रम्प यांनी व्हिजिटर बूकमध्ये अभिप्राय लिहिला. त्यात त्यांनी म्हटले, '' ताजमहल आम्हाला प्रेरणा देतो. हा भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा आहे! थँक्यू इंडिया.'' 

वाचा : मेलानिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी

मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ताजमहल पाहिल्यानंतर फोटो देखील काढले. ट्रम्प आग्रा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मयूर नृत्य करण्यात आले.

वाचा : 'नमस्ते ट्रम्प' म्हणत केले जंगी स्वागत

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एअरफोर्स वन विमानाने आज (ता.२४) अहमदाबाद विमानतळावर स्वागत झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह दोन दिवसीय भारत दौर्‍यावर पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जारेद कुशनर हे देखील सोबत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन झाल्यानंतर रोड शो झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. त्यानंतर ते ताजमहलचे दर्शन घेण्यासाठी आग्र्यात दाखल झाले.
वाचा : पंतप्रधान मोदी हे 'ग्रेट चॅम्पियन ऑफ इंडिया' : ट्रम्प